Thursday 27 October 2016

लहान मुलं व आर्युवेद .

मनुष्याचे वय तीन अवस्थांमध्ये विभागले गेले आहे .

बाल्यवस्था : जन्मापासून ते १६ व्या वर्षापर्यंत .
मध्यावस्था : १६ वर्षापासून ते ६० वर्षापर्यंत .
वृध्दावस्था :  ६० वर्षाच्या पुढे .
मनुष्याच्या शरीरात ३ दोष असतात वात , पित्त आणि कफ . हे दोष साम्याव्यस्थेत असताना शरीर निरोगी असते पण जेव्हा या दोषा मध्ये विषमता घडून येते तेव्हा शरीरामध्ये व्याधीची उत्पत्ती होते .

वृद्धावस्थे मध्ये वात दोषाचे प्राधान्य असते .
मध्यावस्थे मध्ये पित्त दोषाचे प्राधान्य असते .
तर बाल्यावस्थे मध्ये कफ दोषाचे प्राधान्य असते .

त्यामुळे वृद्धावस्थे मध्ये संधिवात , आमवात यासारखे वात विकार , मध्यावस्थे मध्ये आम्लपित्त, त्वचाविकार यासारखे पित्तविकार तर बाल्यावस्थे मध्ये सर्दी, खोकला, दमा यासारखे कफविकार अधिक प्रमाणात आढळून येतात .
सामान्यतः लहांन मुलांना आहारामध्ये दूध जास्तीत जास्त प्रमाणात देण्याकडे पालकांचा कल असल्याचे आढळून येते . दुधामुळे शरीराचे उत्तम पोषण व वाढ होते असे समजले जाते पण बाल्यावस्था देखील तीन अवस्थे मध्ये विभागली जाते -
क्षीरावस्था    : जन्मापासून वयाच्या साधारणता १ वर्षापर्यंत . या अवस्थेमध्ये बालकांसाठी मातृस्तन्य हेच संपूर्ण आहार असते, मातृस्तन्य पचन्यास अतिशय हलके असल्याने बालकांसाठी योग्य असते व त्याने कफ देखील वाढत नाही .
क्षीरन्नादवस्था  : साधारणता १ ते २ वर्षापर्यंत ही अवस्था असते . या अवस्थेमध्ये आईच्या दुधासह अल्प प्रमाणात इतर अन्नपदार्थ देखील दिले जाते , केवळ आईच्या दुधासह पोषण पूर्ण होत नसल्याने इतर अन्नपदार्थ देणे आवश्यक ठरते .
अन्नादवस्था     : वय  वर्ष २ च्या पुढे .
या अवस्थेमध्ये केवळ अन्नपदार्थ दिले जातात .
दुध हे शीत गुणाचे व मधुर रसाचे असल्याने कफ वाढवणारे असते, त्याचप्रमाणे फळ देखील शीत गुणाचे व मधुर रसाचे असल्याने कफ वाढवणारे आहे, व लहान मुलांचे वय हे मुळातच कफाचे असते त्यामुळे दुध व फळ दिल्याने लहान मुलांमध्ये कफ वाढून सर्दी , खोकला या सारखे आजार होत असल्याचे आढळून येते . म्हणून लहान मुलांमध्ये साधारणता वयाच्या ९ वर्षापर्यंत फळे देऊ नये व दुध ऐवजी चहा आदरक टाकून दयावा ( चहा पत्ती कमी टाकणे) .

                                            डॉ अमित प्रकाश जैन .
                                             एम डी आर्युवेद .

No comments:

Post a Comment