Friday 28 October 2016

सुवर्ण बिंदु प्राशन विधी

हे मानवजातीसाठी सर्वोत्तम् टॉनिक मानले जाते . या मध्ये गुणसूत्र ( जीन्स) पर्यंत कार्य करण्याची क्षमता आहे .

∆  सुवर्ण बिंदु प्राशन हे वेक्सिन (लस ) नव्हे, वेक्सिन मुळे त्या त्या विशिष्ट आजारांचे इनफेक्शन होऊ नये म्हणून दिले जाते . सुवर्ण बिंदु प्राशन केल्याने मुलांची स्वतःची व्याधी प्रतिकार क्षमता वाढते जेणे करून मुलं व्याधी मुक्त राहण्यास मदत होते . ह्याने शरीराची व मेंदूची वाढ होण्यास मदत होते .

∆  सुवर्ण बिंदु प्राशन कोणी करावे : -
१ . स्तनपानाने तृप्त न होणारी मुलं .
२ . कृश बालक .
३ . ज्या बालकांना रात्री झोप येत नाही .
४ . स्तनपानानंतर ही रडणारी मुलं .
५ . ज्या बालकांना व्यवस्थीत भूक लागते .
६ . ज्या मुलांच्या आईला दुध येत नाही .
७ . गंभीर व्याधी पीडीत मातेच्या बालकास .
८ . तसेच सदृढ बालकास देखील उपयोगी पडते .

∆ सुवर्ण बिंदु प्राशन विधी : -
                                 सुवर्ण बिंदु प्राशन विधीमध्ये मुलाचे तोंड पूर्वे कडे ठेऊन सुवर्ण( सोन्या) पासुन तयार केलेले विशिष्ट आयुर्वेदीक औषधाचे थेंब पाजले जातात .

  सुवर्ण बिंदु प्राशन वयो मर्यादा : -
                                  जन्मल्यापासुन १० वर्षापर्यंत फलदायी ठरते .

सुवर्ण बिंदु प्राशन कधी करावे : -
                                  सुवर्ण बिंदु प्राशन कधीही केले जावू शकते परंतू पुष्य नक्षत्र वर केल्यास अधिक प्रभावी ठरते .

∆ सुवर्ण बिंदु प्राशन विधीचे फायदे : -

" सुवर्णप्राशनं ह्येततन्मेधाग्निबलवर्धनम् Iआयुष्यं मङ्गलं पुण्यं वृष्यं वर्णंय ग्रहापहम् II "
१ . मेधा ( बुद्धी) वाढण्यासाठी .
२ . भूक वाढण्यासाठी .
३ . बल व रोग प्रतिकार शक्ति वाढण्यासाठी .
४ . आयुष्य वाढण्यासाठी .
५ . कल्याणकारक, पुण्यकारक आहे .
६ . वृष्य आहे .
७ . वर्ण्यकर.
८ . ग्रहबाधा होत नाही .
९ . वजन वाढण्यासाठी .

                                      डॉ अमित प्रकाश जैन
                                       एम डी आयुर्वेद .

2 comments: